Skip to content Skip to footer

खासदार राहुल शेवाळे आणि ‘श्री राधा फाऊंडेशन’ च्या वतीने नवरात्र उत्सवानिमित्त सन्मान


खासदार राहुल शेवाळे आणि ‘श्री राधा फाऊंडेशन’ च्या वतीने नवरात्र उत्सवानिमित्त सन्मान

कोरोनाचा हॉटस्पॉट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धारावीमध्ये सामान्य जनतेला त्वरित आणि योग्य वैद्यकीय मदत मिळवून देणे, कोरोनाबधित रुग्णांचे आणि त्यांच्या नातेवाईकांचे समुपदेशन करणे, अशा अनेक जबाबदाऱ्या यशवीरीत्या पार पाडणाऱ्या श्रीमती पद्मा जोसेफ यांचा ‘कोरोना रणरागिणी’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. कोरोना संकटात उल्लेखनीय कार्य केलेल्या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यासाठी, खासदार राहुल शेवाळे आणि ‘श्री राधा फाऊंडेशन’ यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमा अंतर्गत, श्रीमती जोसेफ यांना हा पुरस्कार बहाल करण्यात आला.

यावेळी खासदार शेवाळे, ‘श्री राधा फाऊंडेशन’च्या अध्यक्षा सौ. कामिनी राहुल शेवाळे, विभागप्रमुख मंगेश सातमकर, प्रभाग समिती अध्यक्ष रामदास कांबळे,महिला विभाग संघटिका रिटाताई वाघ, साई रुग्णालयाचे डायरेक्ट खालिद शेख यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते. अशाच रीतीने नवरात्र उत्सवाच्या नऊ दिवसांत, आरोग्य सेविका, महिला पोलीस, परिचारिका, डॉक्टर्स यांचा सन्मान करण्यात येत आहे.

धारावीतील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी, राज्य सरकार, मुंबई महानगरपालिका, खासदार राहुल शेवाळे आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी पुकारलेल्या लढ्यात श्रीमती पद्मा जोसेफ यांचे मोठे योगदान आहे. सायनमध्ये राहणाऱ्या श्रीमती जोसेफ यांचे धारावीतील या कोरोना लढ्यात मोठे योगदान आहे. येथील साई रुग्णालयाच्या व्यवस्थापकीय विभागात कार्यरत असणाऱ्या श्रीमती जोसेफ यांनी गेल्या सहा महिन्यांत अनेक कोरोनाबधितांना योग्य उपचार त्वरित मिळावेत, यासाठी प्रयत्न केले. तसेच धारावीमध्ये कोरोनासंदर्भात जनजागृती करून सामान्य जनतेला धीर देण्याचं महत्वाचं काम त्यांनी केलं. गरजू रुग्णांना मोफत उपचार, कोरोनाबाधितांच्या कुटुंबियांचे समुपदेशन आणि त्यांना सर्व प्रकारची मदत करण्याचे कार्य त्यांनी अविरतपणे केले आहे.

Leave a comment

0.0/5