Skip to content Skip to footer

पालिकेच्या आरोग्यसेविका श्रीमती दीपाली पाटील यांना खासदार राहुल शेवाळे यांच्या तर्फे ‘कोरोना रणरागिणी पुरस्कार’

पालिकेच्या आरोग्यसेविका श्रीमती दीपाली पाटील यांना खासदार राहुल शेवाळे यांच्या तर्फे ‘कोरोना रणरागिणी पुरस्कार’

धारावीमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अविरतपणे काम करणाऱ्या, मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्यसेविका दीपाली पाटील यांचा ‘कोरोना रणरागिणी’ पुरस्काराने सन्मान करण्यात आला. कोरोना संकटात उल्लेखनीय कार्य केलेल्या कतृत्ववान महिलांचा सन्मान करण्यासाठी, खासदार राहुल शेवाळे आणि ‘श्री राधा फाऊंडेशन’ यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमा अंतर्गत, दीपाली यांना पालिकेच्या जी-उत्तर प्रभाग कार्यालयात हा पुरस्कार बहाल करण्यात आला. यावेळी ‘श्री राधा फाऊंडेशन’च्या अध्यक्षा सौ. कामिनी राहुल शेवाळे, सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर, प्रभाग समिती अध्यक्ष टी एम जगदीश तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.

गेल्या १२ वर्षांपासून मुंबई महानगरपालिकेच्या धारावीतील कुंभारवाडा परिसरातील अयोग्य केंद्रात काम करणाऱ्या श्रीमती दीपाली पाटील यांनी, धारावीतील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे. घरोघरी जाऊन सर्व्हे करणे, नागरिकांकडून त्यांच्या प्रकृतीची माहिती घेणे, संशयित रुग्णांना योग्य ते मार्गदर्शन करून त्यांना कोरोना चाचणीसाठी आरोग्य केंद्रात पाठविणे, कोरोना बधितांना पालिकेच्या कोविड केंद्रात उपचारासाठी दाखल करणे, बाधितांचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे समुपदेशन करणे अशी विविध कामे दीपाली पाटील यांनी धारावीतील वस्त्यांमध्ये जाऊन केली आहेत. विशेष म्हणजे लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आत्तापर्यंत एकही दिवस सुट्टी न घेता दीपाली यांनी रुग्णसेवेचे कर्तव्य निस्वार्थ भावनेने बजावले आहे.अशाच रीतीने नवरात्र उत्सवाच्या नऊ दिवसांत, आरोग्य सेविका, महिला पोलीस, परिचारिका, डॉक्टर्स यांचा सन्मान करण्यात येत आहे.

Leave a comment

0.0/5