‘सिटी सेंटर मॉल’ आगीचा भडका, मंत्री आदित्य ठाकरेंची घटनास्थळी भेट
गुरुवारी सिटी सेंटर मॉलला भीषण आग लागली होती. मात्र अद्याप अग्निशामक दलाच्या जवानांना या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलेले नाही. मागच्या ३ तासांहून अधिक काळ आगीचा भडका कायम होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या आगीमध्ये मॉलचे दोन माजले पूर्णपणे जाळून खाक झाले आहेत. तर दुसऱ्या मजल्यावरील आगीने मोठया प्रमाणात नुकसान केले आहे. आगीने घेतलेला पेट आणि धुमसणारा धूर यामुळे अग्निशमक दलाच्या जवानांना अनेक अडथळे येत होते. त्यामुळे अखेर अग्निशमन दलाने ‘ब्रिगेड कॉल’ची घोषणा केली होती.
सिटी सेंटर मॉलमध्ये आगीची घटना घडली होती, सदर घटनास्थळी नुकतीच भेट दिली. या घटनेबाबत मी सातत्याने माहिती घेत होतो. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही आहे. आपल्या मुंबई फायर ब्रिगेडच्या धाडसी जवानांनी अग्निशामक रोबोट या आधुनिक तंत्रज्ञानासह आग विझविण्यासाठी यशस्वीपणे कार्य केले. pic.twitter.com/A9BvtnzpPk
— Aaditya Thackeray (@AUThackeray) October 23, 2020
दरम्यान राज्याचे पर्यटन, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. या संदर्भातील माहिती मंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्विटद्वारे दिलेली आहे. ‘सिटी सेंटर मॉलमध्ये आगीची घटना घडली होती, सदर घटनास्थळी नुकतीच भेट दिली. या घटनेबाबत मी सातत्याने माहिती घेत होतो. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही आहे. आपल्या मुंबई फायर ब्रिगेडच्या धाडसी जवानांनी अग्निशामक रोबोट या आधुनिक तंत्रज्ञानासह आग विझविण्यासाठी यशस्वीपणे कार्य केले. असे ट्विट त्यांनी केले आहे.