Skip to content Skip to footer

अपक्ष आमदार गीता जैन यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हातात बांधले शिवबंधन !

अपक्ष आमदार गीता जैन यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हातात बांधले शिवबंधन !

मिरा भाईंदरच्या अपक्ष आमदार गीता जैन यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत गीता जैन यांनी ‘मातोश्री’वर शिवबंधन हाती बांधले. आमदार गीता जैन यांनी वयक्तिक स्तरावर शिवसेनेत प्रवेश केला. मात्र भाजपचे नगरसेवक मॉरिस रॉड्रिक्स, अश्विन कसोदरिया, परशुराम म्हात्रे आणि विजय राव यांच्यास जवळपास १० नगरसेवक गीता जैन यांच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

जैन या महापौर असताना कामकाज व वादग्रस्त मुद्द्यांवरून माजी आमदार नरेंद्र मेहतांशी त्यांचे बिनसले. त्यानंतर जैन यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली. परंतु, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे मानले जाणारे मेहता यांच्याच पारड्यात गेल्या वर्षी उमेदवारीची माळ पडली. त्यामुळे गीता जैन यांनी भाजपमधून बंडखोरी करत निवडणूक लढवली होती. त्यांनी भाजपचे उमेदवार नरेंद्र मेहता यांचा पराभव केला होता.

Leave a comment

0.0/5