मुंबई विद्यापीठाच्या २० परीक्षांचे निकाल जाहीर!
मुंबई विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष २०१९-२० च्या अंतिम वर्ष/सत्राच्या नियमित आणि बॅकलॉगच्या २० परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये तृतीय वर्ष बीकॉम सत्र ५ (सीबीसीएस) चा निकाल जाहीर करण्यात आला असून, या परीक्षेचा निकाल ९४.३६ टक्के एवढा लागला आहे. या परीक्षेत एकूण २२ हजार ६५३ विद्यार्थी यशस्वीरित्या उत्तीर्ण झाले. या परीक्षेला २५ हजार ६८२ एवढ्या विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी २४ हजार ५०७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.
तसेच एकूण २० परीक्षांचे निकाल विद्यापीठाच्या संकेतस्थळावरील http://www.mumresults.in/ यावर प्रसिद्ध करण्यात आले आहेत. कोणत्या अभ्यासक्रमांच्या परीक्षांचे निकाल जाहीर झाले ती यादी पुढीलप्रमाणे –
बीकॉम अकॉऊन्ट एन्ड फायनान्स सत्र ६ (सीबीएसजीएस) व नॉन सीबीएसजीएस,
बीकॉम अकॉऊन्ट एन्ड फायनान्स सत्र ५ (सीबीएसजीएस) व नॉन सीबीएसजीएस,
बीकॉम बँकिंग एन्ड इन्श्युरन्स सत्र ६ (सीबीएसजीएस) व नॉन सीबीएसजीएस,
बीकॉम बँकिंग एन्ड इन्श्युअरन्स सत्र ५ (सीबीएसजीएस),
बीफार्म सत्र ७ (चॉईस बेस्ड),
टीवाय बीए कलिनरी आर्ट सत्र ५ (सीबीसीएस),
टीवाय बीए कलिनरी आर्ट सत्र ६ (सीबीसीएस),
बीफार्म सत्र ८ (सीबीएसजीएस),
बीफार्म सत्र ७ (सीबीएसजीएस),
बी-व्होक टुरिझम अँड हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट सत्र ५ (सीबीएसजीएस ७५:२५),
बी-व्होक रिटेल मॅनेजमेंट सत्र ५ (सीबीएसजीएस ७५:२५),
टीवाय बीकॉम इन्वेस्टमेंट मॅनेजमेंट सत्र ५(चॉईस बेस्ड),
टीवाय बीकॉम ट्रांसपोर्ट मॅनेजमेंट सत्र ५ (चॉईस बेस्ड),
टीवाय बीकॉम फायनान्शिअल मॅनेजमेंट सत्र ५ (चॉईस बेस्ड),
बीएस्सी एव्हिएशन सत्र ५ (सीबीसीएस),
टीवाय बीकॉम/ बीएमएस एन्व्हार्यमेंटल मॅनेजमेंट अँड इकोनॉमिक्स सत्र ५ (चॉईस बेस्ड)