Skip to content Skip to footer

कल्याण डोंबिवलीत ७०० खाटांचे आधुनिक रुग्णालय, शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची माहिती

कल्याण डोंबिवलीत ७०० खाटांचे आधुनिक रुग्णालय, शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची माहिती

कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात महापालिकेची दोन रुग्णालये आहेत. कल्याणमध्ये रुख्मिणीबाई आणि डोंबिवलीत शास्त्रीनगर रुग्णालये आहेत. या दोन्ही रुग्णालयात आरोग्य सुविधा व स्टाफ अपूरा होता. त्यामुळे कोरोना काळात खासदार श्रीकांत शिंदे, महापौर विनिता राणे, आयुक्त विजय सूर्यवंशी यांच्या प्रयत्नातून कोविड रुग्णालये सुरु करण्यात आली.

कल्याण-डोंबिवलीत आतापर्यंत ५० हजारांहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यानुसार कल्याण-डोंबिवलीतील कोविड सेंटरमध्ये रुग्णांना योग्य उपचार मिळाले. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४ टक्के इतके झाले आहे. कोविड रुग्णालये सुरु करताना कल्याण पश्चिमेतील आर्ट गॅलरीमध्ये ७०० बेडचे अत्याधुनिक आरोग्य सेवा देणारे रुग्णालय उभारले आहे. या रुग्णालयात सर्व प्रकारच्या सुविधा आहेत.

त्यामुळे आर्ट गॅलरीमध्ये सुरु होणारे कोविड रुग्णालय हे तात्पुरत्या स्वरुपात न ठेवता कायम स्वरुपी रुग्णालय करण्यात येईल, यासंबंधी विचार सुरु आहे, अशी माहिती कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे.

Leave a comment

0.0/5