Skip to content Skip to footer

परदेशातून आल्यामुळे सरनाईक क्वारंटाईन, चौकशी पुढच्या आठवड्यात करण्याची विनंती

परदेशातून आल्यामुळे सरनाईक क्वारंटाईन, चौकशी पुढच्या आठवड्यात करण्याची विनंती   

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरी सक्तवसुली संचनालयाने मंगळवारी सकाळी धाड टाकली होती. आमदार सरनाईक यांच्या घरावर आणि कार्यालयावर छापा टाकण्यात आला होता. तसेच त्यांचे पुत्र पूर्वेश सरनाईक, विंहग सरनाईक यांच्या घरीदेखील ईडीचे पथक पोहोचले होते. त्यात विहंग सरनाईक यांना चौकशीसाठी ईडीने ताब्यात घेऊन तब्बल सात तास चौकशी केली होती. आज सकाळी ११:०० वाजता ईडीने चौकशीसाठी कार्यालयात बोलावले होते.

मात्र, आपण परदेशातून आल्याने आठ दिवस आपल्याला सक्तीने क्वॉरंटाईन राहावे लागणार आहे. शिवाय विहंगची पत्नीही आजारी आहे. त्यामुळे मला चौकशीला उपस्थित राहता येणार नाही, असे सरनाईक यांनी ईडीला कळवले असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. तसे विनंती पत्र ईडीकडे सोपवण्यात येणार आहे.

Leave a comment

0.0/5