मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून ‘कोस्टल रोड’ची पाहणी

मुख्यमंत्री-उद्धव-ठाकरें-Chief Minister Uddhav Thackeray

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून ‘कोस्टल रोड’ची पाहणी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी ‘कोस्टल रोड’ प्रकल्पाची पाहणी केली. त्यांनी प्रियदर्शनी पार्क आणि हाजीअली भागातील ‘कोस्टल रोड’ प्रकल्पाच्या कामाचा आढावा घेतला. तसेच या प्रकल्पात दिवसरात्र मेहनत घेणाऱ्या पालिका अधिकारी आणि कर्मचारी वर्गाचे मुख्यमंत्र्यांनी आभार मानले. ‘कोस्टल रोड’मध्ये दोन मोठ्या बोगद्यांचं काम करण्यात येणार आहे.

हे दोन्ही बोगदे तीन पदरी आहेत. या सर्व कामासंदर्भात रविवारी मुख्यमंत्र्यांनी ‘कोस्टल रोड’ प्रकल्पाची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. लॉकडाऊनमुळे नरिमन पॉईंट ते वरळीपर्यंतचा १० किलोमीटरचा कोस्टल रोडचे कामकाज सात महिने लांबणीवर पडले आहे.

कोस्टल रोड प्रकल्पाचा पहिला टप्पा डिसेंबर २०२२ पर्यंत पूर्ण होणार होता. पण आता या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे काम २०२३ पर्यंत होणे अपेक्षित आहे. वरळी ते नरिमन पॉईंटपर्यंतचा कोस्टल रोडवरील प्रवास पूर्णपणे टोलमुक्त असेल.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here