Skip to content Skip to footer

मुंबईची लोकल सेवा ‘या’ दिवसापासून सुरु होणार, या नेत्याने दिली माहिती

मुंबईची लोकल सेवा ‘या’ दिवसापासून सुरु होणार, या नेत्याने दिली माहिती

कोरोनाच्या पाश्वभूमीवर मागच्या आठ महिन्यांपासून सामान्य नागरिकांसाठी लोकल सेवा पूर्णपणे बंद ठेवण्यात आली होती. फक्त अत्यावश्यक सेवेसाठी बाहेर पडणाऱ्या कर्मचारी वर्गासाठी लोकलच्या कमी फेऱ्या सुरु ठेवण्यात आल्या होत्या. मात्र लोकल सेवा बंद असल्यामुळे सामान्य नागरिकांचे प्रवासादरम्यान मोठ्या प्रमाणात हाल होताना दिसून येत होते.

त्यातच आता लोकल सेवा केव्हा सुरु होणार याचे संकेत मदत आणि पुर्नविकास मंत्री विजय वडेट्टीवार
३१ डिसेंबर पर्यंत प्रवाशांना लोकलने प्रवास करता येणार नाही. नव्या वर्षीच सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा सुरू करण्यात येईल अशी माहिती यापूर्वीच मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल चहल यांनी माहिती दिली होती. कोरोनाचं सावट अद्यापही असल्याने लोकल सेवा सुरू करणे योग्य नसल्याचे सांगत त्यांनी काही दिवस पर्यायी वाहतूकीने प्रवास करण्याचा सल्ला प्रवाशांना दिला.

Leave a comment

0.0/5