Skip to content Skip to footer

मुंबईच्या नाईट कर्फ्यूवर विश्वास नांगरे पाटील यांनी मांडले मत

मुंबईच्या नाईट कर्फ्यूवर विश्वास नांगरे पाटील यांनी मांडले मत

ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खबरदारीच्या उपाययोजनांसाठी बैठक आयोजित केली होती. राज्यातील महानगरपालिका क्षेत्रात रात्री ११ ते पहाटे सहा पर्यंत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून ५ जानेवारीपर्यंत ते लागू राहील. यावर आता मुंबईचे सहपोलीस आयुक्त विश्वास नागरे पाटील यांनी भाष्य केले आहे.

मुंबईत पाचपेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र जमण्यास सक्त मनाई आहे पण संचाराला बंदी नाही, असे स्पष्ट केले आहे. विश्वास नांगरे पाटील यांनी एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना ही माहिती दिली. ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा विषाणू आढळल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत ५ जानेवारी पर्यंत नाईट कर्फ्यू लावला आहे.

नाईट कर्फ्यूमध्ये पाचपेक्षा अधिक नागरिकांनी एकत्र येऊ नये. रात्री अकरानंतर चार पेक्षा लोक कामानिमित्त बाहेर पडू शकतात. चार पेक्षा कमी नागरिक कामानिमित्त बाहेर पडू शकतात,असं विश्वास नांगरे पाटील यांनी स्पष्ट केले आहे. नाईट कर्फ्यू हा नागरिकांच्या सुरक्षा आणि आरोग्यासाठी लावण्यात आला आहे. असे त्यांनी स्पष्ठ केले.

Leave a comment

0.0/5