Skip to content Skip to footer

गटई कामगारांना स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे अपघात विमा योजनेचा घेता येणार लाभ – मयूर चंद्रकांत कांबळे.

गटई कामगारांना स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे अपघात विमा योजनेचा घेता येणार लाभ – मयूर चंद्रकांत कांबळे.

चर्मकार समाजातील चप्पल विक्री आणि चप्पल दुरुस्ती करणाऱ्या गटई कामगारांनाही आता स्व. बाळासाहेब ठाकरे अपघात विमा योजनेचा लाभ घेता येणार आहे. शिवसेना चर्मोद्योग कामगार सेना अध्यक्ष मयुर चंद्रकांत कांबळे यांनी सातत्याने पाठपुरवठा करून सदर मागणी मंजूर करून घेतली आहे.

गटई कामगारांना दिवसाला दोनशे-अडीशे रुपये मिळतात. या तुटपुंज्या रकमेवर गटई कामगारांना आपल्या संसाराचा गाडा हाकावा लागतो. या योजनेमुळे गटई कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

Leave a comment

0.0/5