मुंबईत विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांची संख्या ४० टक्यांनी घटली

कोरोना रुग्णसंख्या कमी होत असली तरी अद्याप कोरोनाचे संकट टळले नाही. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे राज्य सरकार आणि मनपाकडून बंधनकारक करण्यात आले होते. त्यात विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांची संख्या काही प्रमाणात अधिक आढळून येत होती. तसेच विनामास्क वावरणाऱ्या नागरिकांकडून दंड सुद्धा आकारण्यात आला होता.

मात्र आता नियंत्रणात आलेला कोरोना आणि अनलॉक करण्यात आल्यामुळे पूर्वपदावर आलेले जनजीवन या सकारात्मक बाबीनंतर विनामास्क फिरणाऱ्यांची संख्याही ४० टक्क्यांनी कमी झाली आहे. विनामास्क फिरणाऱ्यांची सरासरी संख्या हजारवरून ६०० वर आली आहे.

दरम्यान, आतापर्यंत मुंबईत मनपाकडून १२ लाख ९४ हजार ३१२ जणांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून २६ कोटी २४ लाख ९२ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. कोरोना रोखण्यात मास्क महत्त्वपूर्ण ठरत असल्यामुळे पालिकेने सार्वजनिक ठिकाणी फिरताना मास्क वापरणे अनिवार्य केले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here