Skip to content Skip to footer

मतदारांची नोंदणी ऑगस्ट अखेरीपर्यंत..!

 

पुणे: 18-21 वर्षाच्या वयोगटातील ज्या मतदारांनी जुलै महिन्याच्या मुदतीत नोंदणी केली नाही त्यांच्या साठी भारत निवडणूक आयोगाने नोंदणी करण्याचे अभियान ३१ ऑगस्टपर्यंत वाढविले आहे.

पुण्यातील व राज्यातील सर्व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची नावे यादीत नोंदवली गेली आहेत हे सुनिश्चित करण्यासाठी अभियानाच्या शेवटी जिल्हा निवडणूक विभागाने नोंदणीचा रिपोर्ट घोषित करण्याचे सर्व प्राचार्यांना सांगण्यात आले आहे.

मतदार यादीत नाव नोंदवनियत आलेल्या एकूण 69,516 मतदार नोंदणीतील 31,542 मतदार युवक आहेत. जिल्ह्यात 2 लक्षांहून अधिक युवा मतदार आहेत आणि या सर्वांना नोंदणीकृत करण्यासाठी हे अभियान आहे.

महाराष्ट्र राज्य मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी सर्व युवक मतदारांची नोंदणी केली गेली आहे याची खात्री करण्याच्या उद्देशाने जिल्हा निवडणूक विभागाकडे परिपत्रक जारी केले. उपनिरीक्षक अधिकारी मोनिकासिंह ठाकूर यांनी सांगितले की, या मुदतीत आणखी एक महिना वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 18-21 च्या वयोगटातील मतदारांवर लक्ष केंद्रित केले जाईल. अन्य मतदारही वेबसाइटवर नोंदणी करू शकतात.

निवडणूक आयोगाने गेल्या महिन्यात जिल्ह्यातील 122 महाविद्यालयातील प्राचार्यांना जुलैच्या अखेरपर्यंत 18-21 वर्षाच्या विद्यार्थ्यांची नोंदणी करण्याचा आदेश दिला होता. महाविद्यालयात सुमारे 2 लाख मतदार नोंदणी फॉर्म वितरित केले गेले आहेत. या अभियानात 80,000 विद्यार्थी सामील होण्याची शक्यता आहे.

मतदार नोंदणीसाठी खालील लिंक वर क्लिक करा –https://ceo.maharashtra.gov.in/Registration.aspx

Leave a comment

0.0/5