Skip to content Skip to footer

बस धावली चालक नसतानाही, पिंपरीत मोठी दुर्घटना टळली

पिंपरी-चिंचवड : पिंपरीतील पिंपळे-गुरव बस स्थानकावर काल (सोमवार) अनेकांचे जीव थोडक्यात बचावले.

पीएमपीएमएलच्या एका बसमध्ये चालक आणि वाहक नसताना ही बस अचानक सुरू झाली आणि १०० मीटर पुढे जाऊन दुचाकींना आणि गॅरेजला धडकली.

सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.

काल रात्री साडे आठ वाजता हा प्रकार घडला असून ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

मार्केटयार्ड वरून आलेली बस ची नोंद करायला चालक आणि वाहक गाडी सुरु ठेवूनच खाली उतरले.

त्याचवेळी अचानक ही घटना घडली. दरम्यान, अशा प्रकारच्या बेजबाबदारपणावर कारवाईची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.

अधिक माहितीसाठी

Leave a comment

0.0/5