Skip to content Skip to footer

पिंपरी चिंचवड – ही गवे झाली मनपा मध्ये समाविष्ट

पिंपरी चिंचवड – महापालिकेत गहुंजे, जांबे, मारंजी,हिंजवडी,माण, सांगवणे, नेरे,सह विठ्ठलवाडी व देहुगाव समाविष्ट प्रस्तावाला महापालिकेच्या महासभेत मंजुरी देण्यात आली.

पिंपरी चिंचवड महापालिकेत ९ गावे समावष्ट करण्यासाठीचा प्रस्ताव प्रशासनाने मंजुरीसाठी महासभेपुढे ठेवला. यावरून राष्ट्रवादी,शिवसेनासह भाजपाच्या नगरसेवकांनी चर्चा केली. महापालिकेत १९९७ साली समाविष्ट केलेल्या गावांचा विकास करा त्यानंतरच या गावांचा समावेश करा. समाविष्ट गावांच्या विविध समस्या दुर करा,मुलभूत सुविधा द्या.

https://maharashtrabulletin.com/electricity-complaint-on-toll-free-number-2/

त्यानंतर या गावांचा समावेश करायचा का नाहीतर हा निर्णय घ्या असे विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी महासभेत मत व्यक्त केले.सत्ताधारी नगरसेवकांनी हिंजवडीत आयटी पार्क असल्यामुळे महापालिकेचे नाव जगात जाऊ शकते. त्याच बरोबर गहुंजे स्टेडिअम व संत तुकाराम महाराजांचे देहू महापालिकेत आले तर महापालिकेचा नाव होऊ शकते.

या गावांचा समावेश झाल्यास चांगल्या पद्धतीने विकास करण्यात येईल. रस्ते विज पाण्याचेही नियोजन करण्यात येणार आहे. असे म्हणत सत्ताधारी भाजपाने हा विषय मंजुर केला.

Leave a comment

0.0/5