Skip to content Skip to footer

लोणावळ्यात सहलीला गेलेल्या रेल्वे इंजिनिअरचा दरीत पडून मृत्यू

पिंपरी चिंचवड : लोणावळ्यात पावसाळी सहलीनिमित्त गेलेल्या रेल्वे इंजिनियरचा दरीत पडून मृत्यू झाला. पाय घसरुन तीनशे फूट दरीत कोसळल्यामुळे रोहन महाजनला प्राण गमवावे लागले.

लोणावळ्यातील नागफणी पॉइंटवर रविवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास ही घटना घडली. रोहन महाजन मूळ जळगावचा होता. मात्र नोकरीनिमित्त मुंबईत राहत होता.

रोहन मुंबईहून रेल्वे विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या ग्रुपसह वर्षा सहलीसाठी आला होता. ड्युक्स नोज नावाने ओळखला जाणारा नागफणी सुळका सर्वांनी सर केला. दुपारी सर्वजण उतरु लागले होते. त्यावेळी रोहनचा पाय घसरला आणि तो थेट तीनशे फूट दरीत कोसळला.

दरीत पडताना शरीर बऱ्याच ठिकाणी आदळल्यामुळे त्याला जबर मार लागला होता. यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. लोणावळा पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाल्यानंतर शिवदुर्ग रेस्क्यू टीमला पाचारण केलं. साडेपाच तासांच्या परिश्रमानंतर मृतदेह बाहेर काढण्यात आला.

अधिक माहितीसाठी

Leave a comment

0.0/5