पिंपरीचे महापौरपद सर्वसाधारण महिलेसाठी; महापौराची उत्सुकता

पिंपरी | Mayor of Pimpri for general woman; Mayor's eagerness

पिंपरी महापालिकेच्या महापौरपदासाठी पुढील अडीच वर्षासाठी सर्वसाधारण महिलेसाठी (खुला) आरक्षण राखीव झाल आहे. राज्य सरकारच्या नगरविकास खात्याने आज (बुधवारी) मुंबईत राज्यातील महापालिकांसाठी आरक्षण सोडत जाहीर केली. त्यामुळे महापौरपद चिंचवड की भोसरीकडे जाणार का?, कोणाची महापौरपदी वर्णी लागणार याची उत्सुक्ता लागली आहे.

फेब्रुवारी 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीतील महापालिका महापौरांचा अडीच वर्षाचा कार्यकाल 14 सप्टेंबर 2019 रोजी संपुष्टात आला होता. परंतु, विधानसभा निवडणुकीमुळे महापौरांना मुदतवाढ देण्यात आली होती. राज्य शासनाने 22 ऑगस्ट रोजी अध्यादेश काढून महापौरांना दिलेली तीन महिन्यांची मुदतवाढ 21 नोव्हेंबर रोजी संपुष्टात येत आहे.

त्यामुळे पुढील अडीच वर्षासाठीच्या महापौरपदासाठीची आरक्षण सोडत आज मुंबईत मंत्रालयात काढण्यात आली. त्यामध्ये पिंपरीचे महापौरपद सर्वसाधारण महिलेसाठी (खुला) राखीव झाले आहे. त्यामुळे आता महापौर कोण होणार याची उत्सुक्ता लागली आहे.21 नोव्हेंबर रोजी महापौर, उपमहापौर निवडणूक प्रक्रिया पुर्ण होणार आहे. विद्यमान महापौर राहुल जाधव यांची मुदतवाढ 20 नोव्हेंबर रोजी संपुष्टात येत आहे. नागरीकांचा मागास प्रवर्गातून जाधव महापौर झाले होते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here