पिंपरी-चिंचवडकरांना आतुरता असलेल्या मेट्रोच्या बोगी अखेर शहरात दाखल झाली आहे. नागपूर येथून तब्बल सात दिवसांचा प्रवास करून सहा बोगी आज पिंपरी-चिंचवड शहरात दाखल झाल्या आहेत. बोगी घेऊन ट्रक दाखल शहरात झाल्यानंतर ढोल-ताशांच्या गजरात आणि मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले.
पिंपरी-चिंचवड शहरातील मेट्रोचा मार्ग पाच किलोमीटरपर्यंत पूर्णत्वास आहे. त्यामुळे मेट्रो प्रशासनाला येणाऱ्या नववर्षात ट्रायल रन घ्यायची तयारी आहे. पिंपरी ते स्वारगेट असा मेट्रो मार्ग असणार आहे. मेट्रोच्या कामाला २०१६ मध्ये सुरुवात करण्यात आली. याच भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यात केले होते. नागपूर येथून सहा बोगी २२ डिसेंबर रोजी निघाल्या होत्या. त्या सात दिवसांचा प्रवास करून पिंपरी-चिंचवड शहरात दाखल झाल्या आहेत