कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुणेकरांनी कसली कंबर – पुण्यात विविध ठिकाणी कडकडीत बंद.

कोरोनाचा-वाढत्या-प्रादुर-Coronaca-growing-distal

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुणेकरांनी कसली कंबर – पुण्यात विविध ठिकाणी कडकडीत बंद.

भारतात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण पुण्यात आढळल्यामुळे पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड तसेच आसपासच्या विविध संस्था, संघटना, व्यापारी संघ यांच्या तर्फे बंदचे आव्हान करण्यात आले आहे. पुणे शहरातील लक्ष्मी रस्ता, तुळशीबाग, शुक्रवार पेठे व रविवार पेठ येथे असणाऱ्या प्रमुख बाजारपेठ तीन दिवसांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय व्यापारी संघटनांनी घेतला आहे. जीवनावश्यक गोष्टी वगळून इतर सर्व बाजारपेठा, छोटी दुकाने बंद करण्यात आली असून, सामान्य नागरिकांनी देखील जबाबदारीने व सकारत्मक दृष्टीने पाऊले उचलली आहेत.

पुण्यातील प्रमुख पर्यटन स्थळे, धार्मिक स्थळे याठिकाणी देखील कोरोनाचा वाढत संसर्ग रोख्यांसाठी बंद पाळण्यात आला आहे. श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिर, आळंदी येथील विठ्ठल रुख्मिणी मंदिर व इतर सर्वच मंदीरे बंद करण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतला आहे. एरवी गजबजलेला एफसी रोड, हॉंगकॉंग लेन, प्रसिद्ध हॉटेल्स याठिकाणी देखील बंदच प्रभाव दिसून आला. या लग्न सराईच्या काळात बाजारपेठ बंद केल्यावर चिंता व्यक्त न करता पुणेकरांनी याबाबतीत सुजाणपणे बंदला पाठिंबा दिला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here