भाजप नगरसेवकाला पोलिसांनी घडवली अद्दल

भाजप नगरसेवकाला पोBJP corporates

भाजप नगरसेवकाला पोलिसांनी घडवली अद्दल
सध्या देश कोरोनाच्या विळख्यात अडकल्यामुळे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 21 दिवसाचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. परंतु आता त्यांच्याच पक्षातील नेते आपल्या नेत्याचा आदेश पायदळी तुडवताना दिसत आहे. अशीच घटना पुण्यात घडली आहे.

राज्यात संचारबंदी असताना सर्रास आपल्या कार्यकत्यांबरोबर पिंपरी चिंचवड महानगर पालिकेतील भाजपा नगरसेवक आपल्या गाडीतून रस्त्यावर फिरत होता पोलिसांनी अडवले असतानाही गुटखा खात असलेला हा नगरसेवक गाडीतून उतरला आणि थेट पोलिसांसमोर रस्त्यावर थुंकला. ‘कोरोना’चा फैलाव उघड्यावर थुंकणे, शिंकणे यातून होत असल्यामुळे पोलिस विशेष दक्षता बाळगत आहेत. ही बाब सहन न झालेल्या पोलिसांनी त्या नगरसेवकाला चांगलाच काठ्यांचा प्रसाद दिला.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here