संकटकाळात युवासैनिकांचा प्रशासनाला मजबूत आधार – पुणे येथील युवासेना शाखेचे कोरोना युद्धात मोठे योगदान

संकटकाळात युवासैनिकांचा-Of young soldiers in times of crisis

संकटकाळात युवासैनिकांचा प्रशासनाला मजबूत आधार – पुणे येथील युवासेना शाखेचे कोरोना युद्धात मोठे योगदान

संपूर्ण देशभरात पसरलेल्या कोरोनाचे प्रमुख केंद्र म्हणून पुणे जिल्हा सुरुवातीला ओळखला जाऊ लागला होता. येथे वाढणारा कोरोनाचा संसर्ग हा अधिक गतीने नागरिकांवर त्यांच्या आरोग्यावर धोका निर्माण करत होता. परंतु पुणे जिल्ह्यातील वाढत कोरोनाचा आकडा रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने त्याठिकाणी महत्वपूर्ण उपाययोजना राबविल्या. त्यामुळे अधिक प्रमाणात वाढणारा हे संकट काही प्रमाणात कमी करण्यात आल्याचे दिसून येत आहे.

राज्य सरकारच्या साथीने अनेक समाजसेवा समूह, सेवाभावी संस्था, विविध पक्षाचे पदाधिकारी व अन्य असंख्य समाजसेवा प्रेमी हा लढत आहेत. या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा युवाधिकारी सुरज हिरामण लांडगे यांनी समाजकार्यासाठी समाजाप्रती असलेल्या कर्तव्यासाठी वेळोवेळी कोरोना लढ्यात आपले योगदान दिले आहेत. त्यांच्या प्रभागातल्या नागरिकांकडून अनेकदा परिसर सॅनिटायझेशनची मागणी त्यांनी पालिकेत पाठपुरावा करून पूर्ण केली. त्यानुसार परिसरात नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सॅनिटायझेशन, कोरोना विषयी जनजागृती करणे यामध्ये लांडगे पुढाकार घेत असल्याचे दिसते.

नाभिक समाजाला देखील व्यवसायासाठी मुभा मिळावी. त्यांना देखील झालेल्या आर्थिक नुकसानातून उभारी देण्यासाठी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी केली होती. तसेच प्रभागातील ड्रेनेज दुरुस्ती सारख्या कामांसाठी नागरिकांनी केलेल्या मागण्यांवर ही त्यांनी विशेष लक्ष देऊन पालिकेच्या माध्यमातुन त्यांनी हे कार्य देखील पूर्ण केले. कोरोनाच्या या संकटकाळात देखील युवापिढीने घेतलेला पुढाकार कौतुकास्पद असून, युवासेनेच्या माध्यमातून ते अजूनही या लढ्यामध्ये खंबीरपणे कार्यरत आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here