पुणे, दि. 28 – चलानतून बाद झालेल्या जुन्या नोटा बदलण्यासाठी चाललेल्या 70 वर्षीय वृद्धेकडून एक कोटींच्या जुन्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. डेक्कन पोलिसांनी ही कारवाई केली आहे. गीता शहा असे या 70 वर्षीय वृद्धेचं नाव आहे. जप्त केलेल्या नोटा प्राप्तिकर विभागाकडे सोपवण्यात येणार असून आणि पुढील चौकशी प्राप्तिकर विभागाकडून करण्यात येईल , अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
गीता शहा या इस्टेट एजंट आहेत. गीता शहा जुन्या नोटा बदलण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना आधीच मिळाली होती. त्यानुसार त्यांनी सापळा रचला होता. गीता शहा रिक्षातून एफसी रोडवर पोहोचल्या असता पोलिसांनी त्यांना थांबवून तपासणी केली. यावेळी त्यांच्याकडे एक कोटींच्या जुन्या नोटा असल्याचं समोर आलं. पोलिसांनी या नोटा जप्त केल्या आहेत.