वातानुकूलित पीएमपी चे टप्पे पद्धतीने तिकीट दर 

वातानुकूलित पीएमपी-hinjewadi-ac-bus-airport
वातानुकूलित पीएमपी

पुणे – लोहगाव विमानतळ-हिंजवडी फेज 3 दरम्यान पीएमपीतर्फे सुरू करण्यात आलेल्या वातानुकूलित पीएमपी (एसी) बससेवेमध्ये आता टप्पे पद्धतीने तिकीट दरआकारणी होणार आहे. त्यामुळे 40 रुपयांपासून 180 रुपयांपर्यंत तिकीट असेल.

https://maharashtrabulletin.com/pmp-bus-tukaram-mundhe-pune/

पीएमपी प्रशासनाने 15 जूनपासून ही बससेवा सुरू केली. हिंजवडीपासून विमानतळापर्यंत प्रतिप्रवासी 180 रुपये आणि सिमला ऑफिस ते विमानतळ 120 रुपये तिकीट होते. मात्र, टप्पे पद्धतीने तिकीट दर आकारणी करावी, अशी प्रवाशांची मागणी होती. त्यानुसार विमानतळ ते वाडिया बंगला 40 रुपये, मोलेदिना 60 रुपये, म्हसोबा गेट 80 रुपये, औंधगाव 100 रुपये, विशालनगर 120 रुपये, मानकर चौक 140 रुपये, विप्रो कंपनी सर्कल 160 रुपये आणि हिंजवडी फेज 3 180 रुपये, अशा पद्धतीने तिकीटरचना करण्यात आली आहे. 19 ऑगस्टपासून या दरांची अंमलबजावणी होईल, असे पीएमपी प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

https://maharashtrabulletin.com/pmpml-new-bus-tukaram-mundhe-pune/

अधिक माहितीसाठी

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here