Skip to content Skip to footer

पुणे – खडकवासला धरणातुन 3424 क्यूसेक विसर्ग 

खडकवासला– चार ही धरणात पावसाचे सातत्य कायम राहिल्यामुळे पानशेत धरणाचा विसर्ग 2834क्यूसेक पर्यंत वाढविला आहे. त्यामुळे खडकवासला धरणातुन सोमवारी रात्री अकरा वाजता 3424क्यूसेक पाणी मुठा नदीत सोडले आहे.

सोमवार सकाळपासून 12 तासात खडकवासलायेथे 30मिलिमीटर पाऊस पडला तर पानशेतला 68, वरसगावला 70तर टेमघर येथे 82मिलिमीटर पाऊस झाला आहे. म्हणून पानशेत धरणामधून 990 क्यूसेक पाणी सोडले जात होते. तो विसर्ग दुपारी 2834क्यूसेक पर्यंत सुरू असून यासह वीज निर्मितीसाठी 625क्यूसेक पाणी सोडले जात आहे.

खडकवासला धरणात 1.97 टीएमसी100टक्के, पानशेत धरणात 10.65 टीएमसी म्हणजे 100 टक्के, वरसगाव धरणात 12.30टीएमसी म्हणजे 95.96टक्के टेमघर धरणात 1.71टीएमसी 46.05टक्के पाणी जमा झाले आहे. चार ही धरणात मिळून 26.63टीएमसी म्हणजे 91.36टक्के पाणीसाठा जमा झाला आहे.

अवश्य वाचा – का दाखवत आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वारगेटच्या जेधे चौकातील ट्रान्स्पोर्ट हब मध्ये रस…?

खडकवासला भरेल एवढे पाणी सोडले 
पानशेत 100टक्के भरल्यानंतर जुलै व ऑगस्ट महिन्यात धरणातून व वीज निर्मिती साठी 2.30टीएमसी पाणी आंबी नदीत सोडले आहे. 2.30टीएमसी पाणी म्हणजे धरण पूर्ण क्षमतेने एकदा भरलं एवढे म्हणजे 1.97टीएमसी पाणी नदीत सोडले आहे. पानशेत मधून सोडलेले पाणी धरणात जमा होते.

अधिक माहितीसाठी

Leave a comment

0.0/5