Skip to content Skip to footer

गणेशोत्सव च्या काळात कलावंताना नोटाबंदीचा फटका

टाकळी हाजी (ता. शिरूर, जि. पुणे) : गणेशोत्सव म्हटल की मनोरंजनाचा भरीव कार्यक्रम पहावयास मिळतो. या काळात कलावंताना चांगलीच मागणी होत असते. यावर्षी मात्र नोटाबंदी व वारंवार पावसाच्या हजेरीने विविध कलावंताना त्याचा फटका बसला आहे. गणोशोत्सवाच्या काळात कलावंतामधून नाराजी व्यक्त केली जात आहे.

संपुर्ण जिल्ह्यात श्रीगणेशाची स्थापना होऊन पाच दिवस झाले आहे. गणरायाच्या आगमना अगोदरच जोरदार पावसाच्या हजेरीने सर्वदूर शेतकरी सुखावला आहे. विघ्नहर्ता गणेशाच्या आगमनाने पावसाने जोरदार हजेरी लावल्याचे बोलले जात आहे. यावर्षी खरीप पिके जोरदार येणार असल्याने ग्रामीण भागात सर्वांच्या मनात आनंदाचे वातावरण आहे.

पिण्यास पाणी झाल्याने काही भागात समाधान व्यक्त केले जात आहे. पावसाचे आगमन लक्षात घेता गणेश मंडळानी पत्र्याचे शेड करून गणेशाची स्थापना केलेली पहावयास मिळत आहे. मात्र, मनोरंजनासाठी भरीव कार्यक्रम दिसून येत नाहित. सर्रास पहिल्या दिवशी भजन, प्रवचन व मंगलमय गितांनी गणरायाचे स्वागत करण्यात आले. दररोड होणारी आरती व पूजापाठ सूरू आहेत. त्यानंतर बहुतेक ठिकाणी मनोरंजनाचे कार्यक्रम होत असतात.

मात्र यावर्षी रात्रीचे मनोरंजनाच्या कार्यक्रमांना पावसाच्या हजेरीमुळे फाटा देण्यात आल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे एका बाजूने पावसाच्या आगमनाने सर्वजण समाधानी असले. तरी देखील कलावंत मात्र दुखावलेला दिसून येत आहे. या काळात मोठ मोठे तमाशा फड मालक तमाशाचे कार्यक्रम करतात. मात्र यावेळी नोटाबंदीमुळे त्यांच्या कार्यक्रमांना पाहिजे तेवढी मागणी मिळत नसल्याचे दिसून येत आहे. लहान लहान कलावंत आर्केष्टाच्या माध्यमातून काम करत असतात. कार्यक्रमांना मागणी नसल्याने त्यांच्यामधून नाराजी व्यक्त केली जात आहे.

https://maharashtrabulletin.com/dhol-pathak-three-crore-income/

दरवर्षी श्री गणेशाच्या आगमनापुर्वी कार्यक्रम ठरविण्यासाठी कार्यकर्त्यांची गर्दी पहावयास मिळते. या वर्षी गणेशोत्सव मंडळांमध्ये मोठी हालचाल दिसून येत नाही. गेल्या वर्षी पेक्षा या वर्षी पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. यामुळे समाधान आहे. नोटाबंदी मुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात असून. कार्यक्रम ठरविण्यासाठी मंडळाचे कार्यकर्ते फिरकत नसल्याची खंत तमाशा कलावंत व नृत्यांगणा सिमा पोटे यांनी व्यक्त केली.

अधिक माहितीसाठी

Leave a comment

0.0/5