फरासखाना पोलिस चौकी – दुभाजकाच्या बाहेर धोकादायक पद्धतीने दुचाकी वाहने लावल्यामुळे वळणावर अपघातांची शक्यता आहे.”
सहकारनगर – जड वाहनांच्या पुढे जाण्याच्या घाईमुळे अनेकदा किरकोळ ते मोठ्या अपघातांना सामोरे जावे लागते.
https://maharashtrabulletin.com/aadhar-linked-to-bank/
लक्ष्मीनगर – पोलिस चौकीसमोरील रस्ता एकेरी वाहतुकीसाठी असतानाही नागरिक जाणीवपूर्वक विरुद्ध दिशेने येतात. त्यामुळे वाहतूक कोंडी होऊन किरकोळ अपघात होत असतात
फर्ग्युसन कॉलेज रस्ता – बेशिस्त दुचाकीस्वारांमुळे विद्यार्थ्यांच्या रहदारीने नेहमीच गजबजलेल्या फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावर वाहतूक कोंडी आणि किरकोळ अपघात होत असतात.
लाल महाल चौक – दुचाकीस्वारांच्या अतिघाईमुळे फनेआळी तालीम जवळ वाहतूक कोंडी होत आहे.
वाहतुकीच्या नियमांचे सर्रास उल्लंघन करून चालकांचा बेशिस्तपणा वाढीस लागला आहे. त्यामुळे किरकोळ, तसेच गंभीर अपघातांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. रहदारीच्या रस्त्यांवर टिपलेली ही छायाचित्रे.