पुणे – काजू पुरवठ्याच्या बहाण्याने गुजरात येथील व्यापाऱ्याने येथील इम्पोर्ट- एक्स्पोर्ट कंपनीची तब्बल 67 लाखांची फसवणूक केली आहे. स्वारगेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
दत्तात्रेय मोरे (वय 49, रा. सहकारनगर) यांनी स्वारगेट पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
त्यानुसार चिंतन शहा (रा. गुजरात) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मोरे यांचा स्वारगेट येथे इम्पोर्ट- एक्स्पोर्टचा व्यवसाय आहे.
त्यांची केशर ऍग्रो अँड फ्रूट नावाची कंपनी असून, त्यामार्फत ते कृषी उत्पादने पुरवितात.
त्यांच्या कंपनीने रशियन कंपनीसोबत 26 हजार मेट्रिक टन काजू पुरविण्याचा करार केला होता.
https://maharashtrabulletin.com/3700-raid-after-demonetization/
मोरे यांनी कंपनीला काजूपुरवठा करण्याबाबत ऑनलाइन जाहिरात दिली होती. गुजरातच्या प्रतीक एंटरप्रायजेस कंपनीने त्याला प्रतिसाद देत दरवर्षी एक हजार मेट्रिक टन काजूपुरवठ्याचे आश्वासन दिले.
त्यानंतर मोरे यांनी गुजरातमध्ये जाऊन शहा याची भेट घेतली. शहाने त्याच्या काही मित्रांच्या काजूप्रक्रिया उद्योगाच्या ठिकाणी नेले. रशियाच्या कंपनीच्या प्रतिनिधींनीही काजूचे नमुने बघून परवानगी दिली.
शहाने 30 टक्के ऍडव्हान्स रक्कम भरण्यास सांगितले. त्यानुसार मोरे यांनी 67 लाख 68 हजार रुपये आरटीजीएसद्वारे भरले.
मात्र, त्यानंतर शहा याने टाळाटाळ करून काजू पाठविले नाहीत. त्यावर मोरे यांनी स्वारगेट पोलिस ठाण्यात तक्रार दिली.