आणि पुण्याच्या विक्रमवीराने 66 वर्षांनी नखं कापली…

पुणे :जगातील सर्वात लांब नखं असलेल्या पुण्यातील विक्रमवीराने अखेर बोटांना नेलकटर लावलं! 82 वर्षीय श्रीधर चिल्लाल यांनी तब्बल 66 वर्षांनंतर आपली नखं कापली आहेत. चिल्लाल यांच्या नखांचं जतन ‘रिप्लीज, बिलिव्ह इट ऑर नॉट’ या अमेरिकेतील संग्राहलयात करण्यात येत आहे.

श्रीधर यांची वाढलेली नखं थोडी-थोडकी नव्हे, तर 31 फूट लांब आहेत. म्हणजेच श्रीधर चिल्लाल यांच्या नखांची लांबी साधारण तीन मजली उंच इमारतीइतकी झाली होती.

श्रीधर यांनी वयाच्या 16 व्या वर्षापासून नखं वाढवायला सुरुवात केली होती. डाव्या हाताची नखं त्यांनी इतक्या वर्षांत कापली नाहीत, तर उजव्या हाताची नखं ते नियमितपणे कापत होते.

दुर्दैवाने या विक्रमामुळे त्यांच्या हाताला कायमस्वरुपी अपंगत्व आलं आहे. ते आपल्या डाव्या हाताची मूठ उघडता येत नाही.

वयोमानानुसार श्रीधर यांना नखांची निगा राखणं कठीण जात होतं. झोपतानाही त्यांना नखामुळे अडथळा येत असे. इतकंच काय, वाऱ्याची साधी झुळूकही त्यांच्यासाठी डोकेदुखी ठरत असे.

अशी झाली सुरुवात…

1952 मध्ये श्रीधर यांच्याकडून एका शिक्षकाचं लांब नख चुकून तुटलं. त्यामुळे त्यांना शिक्षकाचा ओरडा खावा लागला होता. ‘तुला तुटलेल्या नखाची किंमत कधीच समजणार नाही, कारण तुझी कशासोबतही बांधिलकी नाही.’ त्यामुळे श्रीधर यांनी आवाहन म्हणून स्वत:ची नखं वाढवायचा निर्णय घेतला.

2016 मध्ये त्यांच्या नखांची नोंद ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये करण्यात आली. आपल्या या अनोख्या प्रेमाचं जतन व्हावं, ही चिल्लाल यांची प्रबळ इच्छा पूर्ण होत आहे. चिल्लाल यांच्या नखांचं जतन ‘रिप्लीज, बिलिव्ह इट ऑर नॉट’ या टाइम्स स्क्वेअरमधील संग्राहलयात करण्यात येत आहे.

via अधिक माहितीसाठी

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here