Skip to content Skip to footer

खग्रास चंद्रगहन म्हणजे नक्की काय असते ?

पुणे : या शतकातील सर्वात माेठं खग्रास चंद्रगहन आज सर्वांना पाहता येणार अाहे. 1 तास दीड मिनिटे इतकी चंद्राची खग्रास अवस्था असणार असून शुक्रवारी रात्री 10.45 मिनिटांनी हे ग्रहण सुरु हाेणार अाहे. अशी माहिती खगाेल शास्त्रज्ञ प्रकाश तुपे यांनी दिली.

आज रात्री पृथ्वीच्या सावल्यांचा खेळ सर्वांना पाहायला मिळणार अाहे. पृथ्वीच्या सावलीतून चंद्र पूर्णपणे जात असल्याने या ग्रहणाला खग्रास चंद्रगहन म्हंटले जाते. या काळात चंद्र हा पृथ्वीपासून दूर जाणार असून त्याचा वेग नेहमीपेक्षा मंदावणार अाहे. त्यामुळे यंदाचे ग्रहण हे या शतकातील माेठे ग्रहण असणार अाहे. शुक्रवारनंतर असे ग्रहण 9 जून 2123 मध्ये पुऩ्हा दिसणार अाहे. जुलै महिन्यामध्ये सुर्य हा पृथ्वीपासून दूर अंतरावर असताे. त्यामुळे पृथ्वीची लांबलचक सावली पडत असते. या ग्रहणादरम्यान चंद्र या सावलीतून जात असल्याने हे ग्रहण पाहायला मिळते. चंद्र पृथ्वीपासून लांब गेल्याने त्याचा छाेटा अाकार, त्याचा मंदावलेला वेग अाणि पृथ्वीची माेठी सावली या तीन प्रमुख कारणांमुळे हे ग्रहण निर्माण हाेते.

तुपे म्हणाले, शुक्रवारी रात्री 10.45 वाजता हे ग्रहण सुरु हाेईल. यावेळी चंद्र पृथ्वीच्या छायेत शिरेल. 11.54 वाजता चंद्र पृथ्वीच्या दाट छायेत प्रवेश करेल. त्यापुढे रात्री 1 वाजता चंद्र हा पूर्णपणे पृथ्वीच्या छायेत शिरलेला असेल. 2.43 मिनिटांनी दाट छायेतून ताे बाहेर पडेल. 4. 59 मिनिटांनी ताे पूर्णपणे पृथ्वीच्या छायेतून बाहेर पडलेला असले. हे संपूर्ण चार तासांचे ग्रहण असेल. पृथ्वीच्या सभाेवतालचे वातावरण याेग्य असेल तर या ग्रहणाच्या काळात चंद्र हा तांबूस रंगाचा दिसेल. तर वातावरण दूषित असले तर चंद्र हा काळवंडलेला पाहायला मिळेल.  हे ग्रहण काेणालाही पाहता येणे शक्य अाहे. या ग्रहणाचे कुठलेही दुष्परिणाम हाेणार नाहीत. या शतकातील हे माेठे ग्रहण असल्याने विद्यार्थ्यांना विज्ञान शिकण्याची ही एक चांगली संधी अाहे.

Leave a comment

0.0/5