आरक्षण मुद्द्यावरुन धनगर समाज आक्रमक

Dhangar Community Demands Reservation

पुणे : मराठा समाजाचं आरक्षण मागणीसाठी राज्यभरात आंदोलन सुरु असताना, आता धनगर समाजही आरक्षण मुद्द्यावरुन आक्रमक झालाय. ५ ऑगस्टला पुण्यात धनगर समाज आरक्षण कृती समितीची बैठक होणार आहे. या बैठकीला धनगर समाजातील सर्वपक्षीय नेते, आजी माजी आमदार- खासदार आणि सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना निमंत्रित करण्यात आलंय. या बैठकीत धनगर समाजाच्या आरक्षणाची दिशा ठरणार आहे. धनगर समाजाचा समावेश आदिवासींमध्ये करण्यात यावा अशी मागणी करण्यात येत आहे.

अधिक माहितीसाठी

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here