शाकाहाराच्या शपथेची ‘गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ मध्ये नोंद

शाकाहाराच्या शपथेची ‘गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ मध्ये नोंद | 1 lakh people took square to become vegetarian

पुणे : शाकाहार, व्यसनमुक्तीची सामूहिक शपथ घेतल्याची नोंद ‘गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ मध्ये करण्यात आली आहे. पुण्यातील शाकाहार, व्यसनमुक्ती आणि जीवदया यासाठी काम करीत असलेल्या डॉ. कल्याण गंगवाल यांना नुकतेच याबाबतचे प्रमाणपत्र सुपूर्त करण्यात आले.

गुरुपौर्णिमेचे औचित्य साधत कोपरगाव-शिर्डी जवळील कोकमठाण येथील जंगली महाराज आश्रमात बाबा ॐ गुरुदेव आत्मामालिक जंगली महाराज यांच्या उपस्थितीत डॉ. कल्याण गंगवाल यांनी ९३,५५० लोकांना शाकाहाराची शपथ दिली होती. एकाचवेळी जवळपास लाख लोकांनी शाकाहाराचा संकल्प करण्याच्या या घटनेची नोंद गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड यांनी घेतली आहे. सादर कार्यक्रमाला जगभरातील २०० पेक्षा अधिक संत उपस्थित होते.

डॉ. कल्याण गंगवाल म्हणाले, ‘शाकाहारासाठी केलेल्या या संकल्पाची नोंद जागतिक स्तरावर झाल्यामुळे आनंद वाटतो. सुखी जीवनासाठी शाकाहार आणि व्यसनमुक्ती अतिशय गरजेची आहे. धार्मिक उत्सवात आपण व्यसनमुक्ती व शाकाहाराचे पालन करतो. विज्ञानानेही शाकाहार हाच आरोग्यपूर्ण आहार असल्याचे सिद्ध केले आहे. पर्यावरणाच्या रक्षणासाठी, ग्लोबल वॉर्मिंग कमी करण्यासाठी शाकाहाराला पर्याय नाही. यापुढेही हे कार्य असेच चालू राहील.’

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here