Skip to content Skip to footer

पुण्याचं नाव बदलून ‘जिजापूर’ करा; संभाजी ब्रिगेडची मागणी

पुणे | पुणे शहराचं नाव बदलण्याची मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे. यासंदर्भात संभाजी ब्रिगेडने राज्य सरकारला पत्र पाठवून तातडीने पाऊल उचलण्याची मागणी केली आहे.

पुणे शहराला छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई म्हणजेच जिजाऊ यांचा वारसा आहे. त्यामुळे पुण्याचं नाव बदलून ‘जिजापूर’ करावं, अशी मागणी संभाजी ब्रिगेडनं केली आहे.

जिजाऊंनी सोन्याचा नांगर फिरवत हे शहर वसवलं आहे. पुणे आता ज्या स्थितीत आहे, ते फक्त जिजाऊंच्या योगदानामुळेच, हे कोणीही विसरणार नाही, असं संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, ‘औरंगाबाद’चं नाव ‘संभाजीनगर’ आणि ‘उस्मानाबाद’चं नाव ‘धाराशीव’ करण्याच्या शिवसेनेच्या मागणीला पाठिंबा असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.

Leave a comment

0.0/5