Skip to content Skip to footer

“उन्नति सोशल फाऊंडेशन चं एक पाऊल पक्षी संवर्धनासाठी”

आज उन्नति सोशल फौंडेशनच्या वतीने एक पाऊल पक्षी संवर्धनासाठी हा उपक्रम राबविण्यात आला. प्रचंड प्रमाणात वाढलेल्या शहरीकरणामुळे पक्षांना होणारी पाणीटंचाई, अन्नाचा अपुरा पुरवठा आणि घरटे बांधण्यासाठी कमी होत चाललेली झाडे या समस्यांवर उपाययोजना करण्यासाठीच हा उपक्रम राबविला आहे. यावेळी रोज सकाळी आपल्या घरासमोर किलबिलाट करून झोप उडवणाऱ्या पक्षांसाठी पाणी पिण्याची सोय, खायला दाणे व घरटे इत्यादी साहित्य पिंपळे सौदागर येथील बाळासाहेब कुंजीर मैदान येथील झाडांवर ठेवण्यात आले.

“पक्षी हे आपल्या दैनंदिन जीवनातील महत्वाचा घटक आहेत, पक्ष्यांचा किलबिलाट आजची पिढी विसरत चालली आहे. त्यासाठी कारणीभूत आपणच आहोत. पक्षीसंवर्धनासाठी सर्वजण अगदी घर बसल्यासुद्धा हातभार लावू शकतात आणि अनेक सामाजिक संस्था त्यासाठी असे उपक्रम घेऊ शकतात. आठवूनी चिऊ-काऊचा घास, घेऊ पक्षी संवर्धनाचा ध्यास असे म्हणून याप्रसंगी उन्नती सोशल फौंडेशन चे संस्थपाक संजय भिसे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

 

या प्रसंगी विकास काटे, राजेंद्र जयस्वाल, रामप्रकाश वासन, प्रकाश माशाळकर, उषा वाकचवरे, शोभा देवरे, मीनाक्षी देवतारे, विनोद भल्ला, वनिता विजय रोकडे, जयश्री भोसले, सविता देशमुख व आनंद हास्य योग क्लब चे सर्व सभासद उपस्थित होते.

Leave a comment

0.0/5