पुणे : फ्रान्समधील बेलफोर्ट शहरात होत असलेल्या जागतिक संगीत महोत्सवामध्ये ‘फ्युजन’ प्रकारात भारतीय शास्त्रीय संगीतातील विविध रागांवर आधारित रचना सादर करण्याची संधी पुण्यातील चार तरुण गायक-वादकांच्या ‘केहेन’ बँडला मिळाली आहे. हा महोत्सव दि. ६ ते १० जून या कालावधीत होत आहे.
हे कलाकार आहेत, प्रणाली काळे, अनुप गायकवाड, प्रफुल सोनकांबळे आणि विश्वनाथ गोसावी! या चौघा कलाकारांनी मिळून ‘केहेन’ बँडची निर्मिती केलेली आहे. हे चौघेही कलाकार भारतीय शास्त्रीय संगीताचे अभ्यासक तर आहेतच पण इतर संगीत प्रकारात सुद्धा त्यांना मनापासून रूची आहे. नव्या पिढीपर्यंत शास्त्रीय संगीत एका वेगळ्या प्रकारातून कसे पोहोचेल हा ध्यास या तरुणाईला आहे.
शास्त्रीय संगीताच्या वाटेवरुन जात असताना पाश्चिमात्य धर्तीवरील संगीताची रळही त्यांना पडली. या सर्वांचा उहापोह म्हणजे ” केहेन”..!
पुण्यातील भारतीय संगीत प्रसारक मंडळाच्या गांधर्व महाविद्यालयात प्रणाली काळे, प्रफुल सोनकांबळे (गायक), विश्वनाथ गोसावी (हार्मोनियम व सिंथेसायझर) व अनुप गायकवाड (तबला व तालवाद्य) विद्यार्थ्यांना संगीताचे धडे देतात.
फ्रान्समधील बेलफोर्ट शहरात आंतरराष्ट्रीय संगीत महोत्सव साजरा होतो. महोत्सवाचे यंदाचे 33वे वर्ष आहे. या महोत्सवातील सादरीकरणासाठी जगभरातील 1185 पेक्षा जास्त बंँडमधून 101 बँडची निवड करण्यात आली आहे. यामध्ये निवड झालेला केहेन हा एकमेव भारतीय बँड आहे. महोत्सवासाठी निवड झालेल्या 101 बँडची निवड विख्यात चित्रपट दिग्दर्शक, निर्माते, संगीत दिग्दर्शक, संयोजक यांनी केली आहे.
संस्थेच्या शिक्षकांची आंतरराष्ट्रीय स्तरावरील संगीत महोत्सवासाठी निवड होणे ही संस्थेच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट आहे. फ्रान्स दौ-यासाठी या शिक्षकांना सर्व प्रकारचे सहाय्य व सहकार्य केले आहे, असे गांधर्व महाविद्यालयाच्या उपप्राचार्या परिणीता मराठे यांनी सांगितले.
——————————————————————————-
’भारतीय शास्त्रीय संगीतातील विविध रागांवर आधारित फ्युजन या प्रकारात मोडणा-या रचना ‘केहेन’ने बांधलेल्या आहेत. डेन्मार्क, ब्राझिल, बल्गेरिया, फ्रान्स या देशांमधील पारंपरिक व आधुनिक संगीताचा सादरीकरणात समावेश केलेला आहे. या सादरीकरणातून सर्व कलाकार मिळून ‘केहेन’च्या माध्यमातून विश्वबंधुत्वाचा संदेश देऊ इच्छितो- प्रणाली काळे, कलाका