Skip to content Skip to footer

दुर्लक्षामुळे हिरवाई लागली मरणपंथाला

कल्याणीनगर:  शास्त्रीनगर चौक ते रामवाडी पोलिस चौकी दरम्यान तीनशे पेक्षा जास्त वृक्ष आहेत. यापैकी काही वृक्षांची हळू हळू कत्तल केली जात आहे. पालिकेकडून या वृक्षांची देखभाल केली जात नसल्याने. काही वृक्ष मरणावस्थाला पोहचली आहेत. या वृक्षांची कत्तल करणाºयावर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

महापालिकने जवळपास दहा वर्षापूर्वी शास्त्रीनगर चौक ते रामवाडी पोलिस चौकीच्या दरम्यान रस्त्याच्या कडेला वृक्ष लागवड केली होती. ही वृक्ष आता मोठी झाली आहे. या वृक्षांची दाट सावली वाहन चालकांना सुखकारक वाटते. या वृक्षांमध्ये अनेक पक्ष्यांनी आपली घरटी केली आहे. या वृक्षांमध्ये रस्त्याला शोभा आली आहे. काही सामाजिक संस्था या वृक्षांची काळजी घेतात. वृक्षांच्या मध्ये साफसफाई करतात. या वृक्षांभोवती संरक्षक भिंत बनवावी अशी मागणी एका सामाजिक संस्थेनी पालिकेकडे केली आहे.

अद्याप पालिकेने संरक्षण भिंत बनवली नाही. काही दिवसापासून समाजकंटकाची या वृक्षांवर वाईट नजर पडली आहे. या ठिकाणचे वृक्ष हळू हळू तोडली जात आहे. दर पंधरा दिवसांनी येथील वृक्षांच्या फांद्या तोडणे तसेच छोटया वृक्षांची कत्तल करण्याचे प्रकार सुरू झाले आहे. यामुळे रस्त्याच्या कडेला असणारी दाट झाडी आता कमी कमी होऊ लागली आहे. पालिकेकडून या वृक्षांना पूर्वी पाणी दिले जात होते. मात्र, आता या वृक्षांना पाणी  दिले जात नाही. यामुळे अनेक वृक्ष जळू लागले आहे. पालिकेने या वृक्षांची देखभाल केली नाही. तर लवकर रस्त्याकडील वृक्ष गायब होण्याची शक्यता आहे.

या  वृक्षांची पाहणी केली जाईल. वृक्ष तोडणाºया समाजकंटकावर कठोर कारवाई केली जाईल. या वृक्षांची गणना केली आहे. त्यानुसार जागेवर वृक्ष आहेत का हे तपासले जाईल. नगररोड वडगावशेरी क्षैत्रिय कार्यालयाकडे वृक्षांना पाणी देण्यासाठी टँकर नाही. त्यामुळे वृक्षांना पाणी देता नाही. या भागासाठी एक पाण्याचा टँकर देण्यात यावा अशी मागणी वरिष्ठ अधिकाºयांकडे केली आहे.

Leave a comment

0.0/5