Skip to content Skip to footer

महापालिकेच्या पाण्याची होते चोरी : आयुक्तांचा दावा

पुणे : पुणेकरांना तुम्हाला माहित आहे का, तुमचे पाणी चोरीला जातेय ? एक नव्हे दोन नव्हे तब्बल साडेपाच अब्ज घनफूट (टीएमसी) पाणी चोरी आणि गळतीद्वारे झिरपत आहे. खुद्द महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनी जलसंपदा विभागाला ही माहिती लेखी कळविली आहे. चोरी कोणत्या मार्गाने होते याचे मात्र स्पष्टीकरण त्यात देण्यात आले नाही.
महानगरपालिकेचा पाणी वापराबाबत जलसंपदा विभागाच्या वाद निवारण अधिकारी, जलसंपत्ती प्राधिकरण आणि उच्च न्यायालयात दावे सुरु आहेत. महापालिका आणि पाटबंधारे विभागात झालेला पाणी करार फेब्रुवारी २०१९मधे संपुष्टात आला आहे. उच्च न्यायालयाने पाणी कोटा निश्चित करण्याचे आदेश महापालिकेला दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेने १२ एप्रिल २०१९ रोजी जलसंपदा विभागाला लेखी कळविले असून, त्यात प्रथमच गळती बरोबरच पाणी चोरीचा देखील उल्लेख केला आहे. ही कागदपत्रे ” लोकमत ” ला मिळाली आहेत.

सप्टेंबर २०१७ मध्ये पुणे शहराला लोकसंख्येच्या नुसार वार्षिक ८.१९ टीएमसी (दररोज ६३५ एमएलडी) पाणी वापरास महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने मंजुरी दिली होती. त्यानंतर खडकवासला प्रकल्पाच्या कालवा सल्लागार समितीच्या ४ ऑक्टोबर २०१८ रोजी झालेल्या बैठकीत पुणे शहराला वार्षिक ११.५० टीएमसी (दररोज ८९२ एमएलडी) पाणी देण्याचा निर्णय झाला. मात्र, ऐन निवडणुकीच्या तोंडावर शहराला पाणी कमी देणे परवडणारे नसल्याने, राज्य सरकारने १३०० ते १३५० दशलक्ष लिटर पाणी वापराची सूचना दिली होती. सध्याही तसाच वापर सुरु आहे. हा पाणीवापर वार्षिक १७ टीएमसी इतका होतो.

Leave a comment

0.0/5