Skip to content Skip to footer

रिझरर्वेशन करण्यासाठी आलेल्या प्रवाशाला लुटले

पुणे स्टेशन येथे रिझर्वेशन करण्यासाठी आलेल्या एका तरुणाला मारहाण करुन त्याच्याकडील माेबाईल आणि 20 हजार रुपये लुटल्याची घटना गुरुवारी दुपारी 2 च्या सुमारास घडली. याप्रकरणी अनुज सराेज (वय 20 रा. साई साेसायटी वाघाेली) या तरुणाने बंडगार्डन पाेलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीवरुन अज्ञात चाेरट्यांविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अनुज हा गुरुवारी दुपारी 2 च्या सुमारास पुणे स्टेशन येथील सिग्नलच्या चाैकात आला हाेता. त्यावेळी तेथे असललेल्या दाेघांनी तुम्हाला कमी पैशामध्ये रिझर्वेशन करुन देताे असे सांगितले. तसेच अनुज जवळची कापडी सॅक त्यांनी मागितली. याला अनुजने नकार दिला. त्यामुळे आराेपींनी जबरदस्तीने त्याच्याकडची बॅग हिसकावून घेतली. तसेच त्याचा माेबाईल सुद्धा लांबवला. एकूण 24 हजार रुपयांचा ऐवज घेऊन चाेरटे पसार झाले. याप्रकरणी बंडगार्डन पाेलीस स्टेशनचे पाेलीस उपनिरीक्षक ए. एस. ठाेंबरे अधिक तपास करत आहेत.

Leave a comment

0.0/5