पुणे: पुणे शहर उपनगरातील मॉल आणि मल्टिप्लेक्स मध्ये येणाऱ्या लोकांना मोफत पार्किंग ची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी महानगर पालिकेने पाऊल उचलले असून, वाहन चालकांकडून पार्किंग शुल्क घेऊ नये, असा ठराव महानगरपालिकेच्या शहर सुधारणा समितीने शुक्रवारी केला.
पार्किंग शुल्क घेणाऱ्या मॉल व्यवस्थापना विरुद्ध कारवाई होणार आहे मात्र या निर्णयाची खरोखर अंमलबजावणी होणार का याबाबत साशंकता आहे.मॉल आणि मल्टिप्लेक्समध्ये तासानुसार भरमसाठ पार्किंग शुल्क घेतले जात असल्याने वाहन चालकांची – मालकांची गैरसोय होत आहे . अशा प्रकारे बेकायदा शुल्क आकारणी होत असल्याने मोफत पार्किंग पुरवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती शहर सुधारणा समितीचे अध्यक्ष अमोल बालवाडकर यांनी दिली.
शहरात सध्या ४० मॉल आणि मल्टिप्लेक्स असून, त्याठिकाणचे पार्किंग शुल्क ४० ते १०० रुपये असल्याची तक्रार महानगरपालिकेकडे आहे. बहुतांशी मॉल मध्ये दिवसभराऐवजी प्रत्येक तासानुसार पैसे घेतले जातात. मुळात खरेदीसाठी येणाऱ्या लोकांकडून अश्याप्रकारे पार्किंग शुल्क वसूल करणे चुकीचे आहे. तरीही मॉल व्यवस्थापनांनी आपापल्या सोयीनुसार पार्किंग शुल्क निश्चित केले आहेत. सामान्यांना दिलासा देण्यासाठी पार्किंग शुल्क नसावेत, असा ठराव मंजूर करण्यात आला आहे.
श्री. अमोल बालवाडकर म्हणाले “मॉल आणि मल्टिप्लेक्समध्ये मोफत पार्किंगची सुविधा हवी परंतु, वाहनांच्या स्वरूपानुसार शुल्क ठरिवले आहेत. ठेकेदारामार्फत वाहनचालकांची अडवणूक करून पैसे वसूल केले जातात. नव्या निर्णया नुसार पार्किंग शुल्क आकारणाऱ्या मॉलला नोटिसा देण्यात येईल त्यानंतर कठोर कारवाई करण्याची सूचना विविध खात्यांनी केली आहे”
1 Comment
गणेश मिठारे
कृपया हॉस्पिटल पार्किंग मध्ये जे पैसे घेणं चालू आहे ते थांबवले तर सामान्य माणसांना दिलासा मिळेल