Skip to content Skip to footer

नेमकं कसं आहे इयत्ता अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक ? जाणून घ्या..

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेच्या ऑनलाईन निकाल दि. ८ जून रोजी जाहीर करण्यात आला होता. त्यानंतर बहुतेक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. दहावीच्या परीक्षेच्या गुणपत्रिकांचे वाटप शुक्रवारी (दि. २१) केले जाणार आहे. विद्यार्थ्यांना दुपारी ३ वाजल्यानंतर त्यांच्या शाळांमध्ये गुणपत्रिका मिळतील. अकरावी प्रवेश प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे.

शुन्य फेरी

* दि. १९ ते २४ जून : कला, वाणिज्य व विज्ञान तसेच द्विलक्षी विषय व एचएसव्हीसी शाखेसाठी – अ. भाग १ न भरलेल्या विद्यार्थ्यांनी भाग १ व भाग २ भरणे
ब. भाग १ भरलेल्या विद्यार्थ्यांनी भाग २ भरणे
* दि. १९ ते २९ जून (सायं. ५ वाजेपर्यंत) : १. कला, वाणिज्य व विज्ञान शाखेसाठी – अ. भाग १ न भरलेल्या विद्यार्थ्यांनी भाग १ व भाग २ भरणे
ब. भाग १ भरलेल्या विद्यार्थ्यांनी भाग २ भरणे
२. कोटा प्रवेश (व्यवस्थापन, इन-हाऊस, अल्पसंख्याक) कनिष्ठ महाविद्यालय स्तरावर अर्ज स्वीकारणे आणि कोटा प्रवेशातील गुणवत्ता याद्या संबंधित कनिष्ठ महाविद्यालय स्तरावर प्रदर्शित करणे. संबंधित कनिष्ठ महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांचे निश्चित झालेले प्रवेश वेळेत अपडेट करणे बंधनकारक आहे.
* दि. २६ जून (सायं. ६ वाजेपर्यंत) : द्विलक्षी विषयाची गुणवत्ता यादी प्रसिध्द करणे
* दि. २७ व २८ जून (स. ११ ते ५) : द्विलक्षी विषयातील विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित करणे
* दि. १ जुलै (स. ११ वा.) : सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिध्द करणे
* दि. २ व ३ जुलै (स. ११ ते ५) : त्रुटी व हरकतींवर आक्षेप शिक्षण उपसंचालक कार्यालयात नोंदविणे
पहिली फेरी
* दि. ६ जुलै (सायं. ६ वा.) :  पहिली गुणवत्ता यादी प्रसिध्द करणे
* दि. ८ व ९ जुलै (स. ११ ते ५ वाजेपर्यंत ) आणि दि. १० जुलै (स. ११ ते ३) : पहिल्या गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित करणे
* दि. १० जुलै (सायं. ७ वा.) : पहिल्या गुणवत्ता यादीची कट आॅफ व दुसºया गुणवत्ता यादीसाठी उपलब्ध जागा प्रसिध्द करणे
* दि. ११ व १२ जुलै (स. ११ ते ५) : प्रवेशाचा भाग १ व भाग २ भरणे आणि आवश्यकता भासल्यास भाग २ मध्ये बदल करणे

दुसरी फेरी 
* दि. १५ जुलै (सायं. ६ वा.) : दुसरी गुणवत्ता यादी प्रसिध्द करणे
* दि. १६ व १७ जुलै (स. ११ ते ५ वाजेपर्यंत ) आणि दि. १८ जुलै (स. ११ ते ३) : दुसºया गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित करणे
* दि. १८ जुलै (सायं. ७ वा.) : दुसºया गुणवत्ता यादीची कट आॅफ व दुसºया गुणवत्ता यादीसाठी उपलब्ध जागा प्रसिध्द करणे
* दि. १९ व २० जुलै (स. ११ ते ५) : प्रवेशाचा भाग १ व भाग २ भरणे आणि आवश्यकता भासल्यास भाग २ मध्ये बदल करणे

तिसरी फेरी
* दि. २३ जुलै (सायं. ६ वा.) : तिसरी गुणवत्ता यादी प्रसिध्द करणे
* दि. २४ व २५ जुलै (स. ११ ते ५ वाजेपर्यंत ) आणि दि. २६ जुलै (स. ११ ते ३) : तिसºया गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित करणे
* दि. २६ जुलै (सायं. ७ वा.) : तिसºया गुणवत्ता यादीची कट आॅफ व दुसºया गुणवत्ता यादीसाठी उपलब्ध जागा प्रसिध्द करणे
* दि. २७ व २८ जुलै (स. ११ ते ५) : प्रवेशाचा भाग १ व भाग २ भरणे आणि आवश्यकता भासल्यास भाग २ मध्ये बदल करणे
विशेष गुणवत्ता फेरी
* दि. ३१ जुलै (सायं. ६) : विशेष गुणवत्ता यादी प्रसिध्द करणे
* दि. १ व २ आॅगस्ट (स. ११ ते ५) : विशेष गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित करणे
* दि. ३ आॅगस्ट (स. १० वा.) : उपलब्ध रिक्त जागा प्रसिध्द करणे

Leave a comment

0.0/5