फर्निचरच्या कामावर असलेल्या मुलाकडून दुकानाचा मालक घरकाम करुन घेत असे. काही दिवसांनी तरुणाने घरकाम करण्यास नकार दिला. त्यावर दुकान मालकाने इतर आराेपींच्या मतदीने तरुणाला मारहाण केली. या मारहाणीत तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समाेर आली आहे. याप्रकरणी तरुणाच्या वडीलांनी चंदननगर पाेलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.
रामस्वरुप ( वय 21 ) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पप्पुराम, जगदीश, हजारीराम यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरुणाचे वडील हरजीदास यांनी तक्रार दाखल केली आहे. पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हरजीदास यांनी रामस्वरुप याला दाेन महिन्यापूर्वी आराेपीकडे फर्निचरच्या कामासाठी पुण्याला पाठवले हाेते.