धनकवडी : कानिफनाथ चौकालगतच्या मुंगळे अण्णानगर येथील भर वस्तीत राहणाऱ्या नगरसेविकेच्या घरात मंगळवारी दुपारी झालेल्या चोरीच्या घटनेत कपाटत ठेवलेले सव्वासात लाख रूपये चोरट्यांनी लंपास केले आहेत. धनकवडी पोस्ट ऑफिस चौक या गजबजलेल्या परिसरात नगरसेविका अश्विनी भागवत राहतात. त्यांच्या दुमजली घराच्या वरच्या मजल्यावर जाऊन चोरट्यांनी हि रक्कम लांबवली आहे.
सागर यांचे मित्र अमोल पाटील यांचे लग्न गुरूवारी होते. तत्पुर्वी पाटील यांनी लग्नाच्या खरेदीसाठी सव्वा पाच लाख रूपये सागर यांच्याकडे ठेवले होते. सागर यांचे व्यवसायातील दोन लाख रूपयेही त्याच कपाटाच्या ड्रावरमध्ये होते. सर्वसाधारण सभेसाठी अश्वीनी त्यांचे पती सागर भागवत हे साडेअकरा वाजता महापालिकेत जाण्यासाठी घराबाहेर पडले. तळ मजल्यावर त्यांची मुलं खेळत होती.