Skip to content Skip to footer

पुणे शहरात ३००० नागरिकांच्या उपस्थितीत जागतिक योग दिन साजरा…

आज दिनांक २१ जून २०१९ जागतिक योग दिंनानिमित्त संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहाने योग साधना केली गेली. माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेली ही योग विद्या प्रसार प्रचार चळवळ सुरु ठेवण्याच्या प्रयत्नांतून आज पुणे येथे ही ठिकठिकाणी योग शिबिरांचे आयोजन केले गेले होते. पुणे शहर सुधारणा समिती अध्यक्ष मा. श्री अमोल बालवाडकर यांनी आज बालेवाडी येथे योग साधनेचा उपक्रम राबविला.

 

आज बालेवाडी स्टेडियम, पुणे येथे जागतिक योग दिंनानिमित्त योग शिबीर आयोजित करण्यात आले. त्यावेळी महानगरपालिका आयुक्त श्री. सौरभ राव उपस्थित होते. योग साधनेचे महत्व प्रसारित करण्याच्या उद्देशाने हे शिबीर आयोजित करण्यात आले होते.

बालेवाडी तसेच पुणे शहरातील तीन हजार नागरिकांनी ह्या शिबिरात सहभाग नोंदविला, असे शहर सुधारणा समिती अध्यक्ष अमोल बालवाडकर यांनी मुलाखती दरम्यान सांगितले.

Leave a comment

0.0/5