पुणे महानगर पालिकेकडून मॉल, मल्टिप्लेक्स मधील पार्किंग शुल्कांवर निर्बंध लागू करण्यात आले. कुठल्याही नियमांचा आधार नसूनही मॉल, मल्टिप्लेक्स धारकांकडून लुटले जाणारे पार्किंग शुल्क बंद करण्यात आले असून जनतेच्या पार्किंग समस्येला ह्यातून काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे.
मॉल व मल्टिप्लेक्समधील वाढत्या पार्किंग समस्येसाठी पुणे महानगर पालिकेद्वारे नवे नियम लागू करण्यात आले. त्या नियमांतर्गत मॉल व मल्टिप्लेक्स मधील ते पार्किंग ही निशुल्क करण्यात आले आहेत. जेणेकरून तिथे येणाऱ्या जनतेला पार्किंगचे शुल्क मोजावे लागणार नाही. मॉल, मल्टिप्लेक्स मध्ये येणाऱ्या जनतेची पार्किंगची गैरसोय टाळण्यासाठी हे नवे नियम लागू करण्यात आले आहेत. मॉल मल्टिप्लेक्स मालकांना पार्किंगसाठी तळघराची परवानगी देण्यात येत असूनही पार्किंग शुल्क आकारणे हे नियमबाह्य आहे.