Skip to content Skip to footer

जाचक पार्किंग शुल्कांतून पुणेकरांची मुक्तता !!! सविस्तर वाचा…

पुणे शहरातील सर्वच मॉल, मल्टिप्लेक्स मधील पार्किंग शुल्कांवरील नियमांची अंमलबजावणी सुरु झाली असून, अनेक ठिकाणी नागरिकांनी ह्या बद्दलची माहिती दिली. मॉल व मल्टिप्लेक्समधील पार्किंग शुल्कांची होणारी अरेरावी लूटमार व त्यातून होणारी नागरिकांची गैरसोय जाणून पालिकेने ते शुल्क रद्द करण्याचे योजिले होते. कुठल्याही मॉल अथवा मल्टिप्लेक्स मध्ये पार्किंग शुल्क आकारण्यावर पालिकेने खंडणीचा गुन्हा दाखल करण्याचे नियम जारी केले आहेत.

आजपासून पुणे येथील प्रसिद्ध पॅव्हेलीयन मॉल येथे पार्किंग शुल्क रद्द करण्यात आले असून, पालिकेने पार्किंग शुल्कांवरील घेतलेल्या ह्या निर्णयाचे सर्वच माध्यमातून स्वागत केले जात आहे. अनेक ठिकाणी नागरिकांना होणारा पार्किंग शुल्काचा त्रास संपवण्यासाठी पालिकेने हा कठोर निर्णय घेतला आहे.

पुण्यातील अन्य मॉल ,मल्टिप्लेक्स मध्ये जर अशा प्रकारचे शुल्क आकारले गेले तर त्याबद्दल महानगरपालिका महापौर यांच्या संकेतस्थळावर (info@punecorporation.org) त्याबद्दलची तक्रार नोंदवावी, अशी माहिती शहर सुधार समिती अध्यक्ष अमोल बालवाडकर यांनी दिली असून त्या मॉल, मल्टिप्लेक्स मालकांवर त्या तक्रारींद्वारे कारवाई केले जाईल असे ही त्यांनी सांगितले

Leave a comment

0.0/5