Skip to content Skip to footer

पुण्यातील मॉल-मल्टिप्लेक्स मध्ये मोफत पार्किंग : पालिकेचा मॉल मालकांना दणका..

पुणे:पार्किंगच्या नावावर शुल्क वसूल करणाऱ्या मॉल व मल्टिप्लेक्स मालकांना आता चांगलीच धडकी भरली आहे.
महानगर पालिकेच्या सर्वसाधारण सभेच्या बैठकी मध्ये घेण्यात आलेल्या मोफत पार्किंगच्या निर्णयाची अंमलबजावणी सुरु झाली असून, पुणे शहरामधील सर्व मॉल व मल्टिप्लेक्स मध्ये लुटले जाणारे पार्किंग शुल्क आता बंद करण्यात आले आहे. पार्किंग शुल्कांवरील ह्या निर्णयाचे मॉल व मल्टिप्लेक्स मालकांनी धसका घेत तातडीने पार्किंग शुल्क रद्द केले आहेत.
शहरातील एकूण किती मॉल व मल्टिप्प्लेक्स मालकांनी ह्या नियमांचे पालन केले आहे, या आढावासोमवारी (दि.२३) पालिकेकडून घेण्यात येणार असून नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल.

शहरातील सर्वच मॉल व मल्टिप्लेक्स मध्ये पार्किंग शुल्काच्या नावाखाली १०० रुपयांपर्यंतची लूट केली जात होती. मोफत पार्किंगच्या नियमांना आळा घातला जात होता. परंतु पालिकेने घेतलेल्या मोफत पार्किंगच्या निर्णयामुळे पार्किंग शुल्काच्या लुटमारीवर रोख लागली आहे. पालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकी दरम्यान शहरातील मॉल व मल्टिप्लेक्स मधील पार्किंग शुल्क रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याप्रमाणे मोफत पार्किंग बद्दलच्या नियमांचे पालन करण्यासाठी सर्व मॉल व मल्टिप्लेक्स मालकांना नोटीस बजावल्या गेल्या. त्यामध्ये पार्किंग शुल्क आकारल्यास खंडणीचा गुन्हा दाखल करण्याची सक्त ताकीद पालिकेद्वारे देण्यात आली.

तातडीने पार्किंग मोफत करताना सेनापती बापट रोड वरील पॅव्हेलियन मॉल मधील पार्किंग शुल्क मॉल मालकांकडून बंद करण्यात आले असून, नागरिकांसाठी मोफत पार्किंग उपलब्ध करून दिले. ह्याबद्दलची माहिती शहर सुधारणा समितीचे अध्यक्ष अमोल बालवडकर यांनी दिली.

Leave a comment

0.0/5