Skip to content Skip to footer

रिक्षावाल्याच्या तोंडावर थुंकून दोघांचे रिक्षासह पलायन

पुणे : लघुशंकेसाठी उतरलेल्या प्रवाशांनी रिक्षावाल्याचा तोंडावर थुंकून त्याच्या रिक्षासह पलायन केले आहे. या संदर्भात दोन व्यक्तींवर खडकीपोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रिक्षाचालक वसीम अहमद (वय २७, राहणार लोहगाव रस्ता) यांनी या संदर्भात तक्रार दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, शुक्रवारी (दि. २१) मध्यरात्री तीन वाजता शुक्रवार पेठेतून वसीम यांच्या रिक्षात दोन प्रवासी बसले.
त्यांनी खडकी येथे जायचे सांगून प्रवासास सुरुवात केली. मात्र खडकीच्या अलीकडे त्यांनी लघुशंकेसाठी रिक्षा थांबवण्यास सांगितली. त्यावेळी वसीम यांच्यासह दोन प्रवासीही खाली उतरले. त्यावेळी पुन्हा रिक्षात बसण्याआधी त्यातल्या पान खाल्लेल्या तोंडाने थुंकीची पिंक रिक्षावाल्याचा तोंडावर टाकली. त्याने सावरण्याआधीच दोनही आरोपींनी रिक्षात बसून पलायन केले.

या रिक्षात मोबाईल आणि डिकीत १५हजार ३०० रुपये होते. या फिर्यादीवरून खडकी पोलिसांनी तपास सुरु केला असून त्याकरिता सीसीटीव्हीचे फुटेज ताब्यात मिळवले आहे. शिवाय घटनास्थळावरून रिक्षा कुठे गेली याचाही शोध सीसीटीव्हीच्या माध्यमातून घेण्यात येत आहे.

Leave a comment

0.0/5