पुणे : कुठ्ल्यावेळी काय वेळ येईल हे सांगता येत नाही. पण अशा परिस्थितीतही जो धैर्याने मार्ग काढतो तो खरा माणूस. ही गोष्ट आहे आळंदीत शिकणाऱ्या हर्षित अग्रवालची. रोममध्ये प्रबंध सादर केलेल्या हर्षितवर तिथे ऍसिड हल्ल्यासारखे गंभीर संकट ओढवले. मात्र त्यातूनही मार्ग काढत त्याने भारतीय दूतावासाची मदत मिळवली. लवकरच ती भारतात परतणार आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,हर्षित मूळ मध्य प्रदेशमधील रानपूरचा रहिवासी आहे. तो पुण्याजवळील आळंदी येथील एमआयटीमध्येसंगणकशास्त्राचे शिक्षण घेतो. तो त्याच विषयातील प्रबंध सादर करण्यासाठी गेला होता. प्रबंध सादर करून बुधवारी परतणार असताना विमानतळावर जाण्यासाठी त्याने टेस्कोलाना मेट्रो स्टेशनमध्ये प्रवेश केला. मात्र तिथे सहा चोरांनी मिळून त्याच्यावर ऍसिड हल्ला केला. त्यांना त्याच्या लॅपटॉपबॅगला लक्ष करायचे होते मात्र त्याने बॅग न सोडल्याने पुन्हा त्याच्यावर हल्ला झाला आणि अखेर चोर ती बॅग नेण्यात यशस्वी झाले.