Skip to content Skip to footer

पुणे येथे बनावट आरटीई प्रवेश मिळवून देणारी टोळी जेरबंद

आधार कार्डावरील पत्ता बदलून, बोगस आधारकार्ड तयार करुन त्याबरोबरच अन्य कागदपत्रे बनावट बनवून त्याद्वारे आर्थिक दुर्बल गटातील  मुलांसाठी राखीव असलेल्या आरक्षणाचा फायदा धनदांडग्यांना मिळवून देणाऱ्या टोळीचा पर्दाफाश हडपसर पोलिसांनी केला आहे. बनावट कागद तयार केले असले तरी ऑनलाईन प्रक्रियेतून प्रवेश मिळवून देणाऱ्या  सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत पोलीस पोहचतात का नाही? याकडे सर्वसामान्य पालकांचे लक्ष राहणार आहे.

या प्रकरणी हडपसर पोलिसांनी ५ जणांना अटक केली. दीपक विठ्ठल गरुड (वय ३६, रा. महादेवनगर, हडपसर), सचिन रतन बहिरट (वय ३६, रा. माळवाडी, हडपसर), सुधीर अभिमन्यू काकडे (वय ३५, रा. माळवाडी, हडपसर), ऋषिकेश भानुदास ढमाले  (वय २८, रा. टाकवे खुर्द ता. मावळ) आणि अनिकेत सुरेश शिंदे (वय ३२, रा. शुक्रवार पेठ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

त्यांच्याकडून बनावट आधार कार्ड, दोन लॅपटॉप, पेन ड्राईव्ह, कलर प्रिंटर, बनावट शिक्के तसेच अन्य बनावट कागदपत्रे असा सुमारे दीड लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे. न्यायालयाने आरोपींना ५ दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे.
ज्यांचे वार्षिक उत्पन्न १ लाखाच्या आतील आहे, अश्या पालकांच्या विध्यार्थ्यांना आरटीइ २५ टक्के अंतर्गत प्रवेश दिला जातो. शासनाच्या आरटीइ योजनेअंतर्गत नर्सरी ते १ ली या वगार्तील प्रवेश करून देण्यासाठी पालकांचे बनावट पत्ते असलेले आधारकार्ड, बनावट उत्पनाचे दाखले बनवून शिक्के मारूनत्यांना शाळेत प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून ५० हजार ते दीड  लाख रुपये घेत.

आरोपी बनावट कागदपत्रे तयार करुन त्यावर बनावट शिक्के मारत आणि ती आरटीईच्या आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेत सादर करीत असत. नामांकित शाळेमध्ये एका वषार्ची फी लाखो रुपये आहे. त्यामुळे ८ वि पर्यंतचे शिक्षण हे एकदा प्रवेश घेतला कि मोफत होते. तर दुसरीकडे या योजनेअंर्तगत गरीब विध्यार्थ्यांना मिळणाºया त्यांचा लाभ व हक्काच्या शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. या आरोपीने  २०१८ व २०१९ या दोन वर्षांत सुमारे ८५ विध्यार्थ्यांना प्रवेश दिले आहेत.हडपसर येथील मेघराज लॉजवर ही टोळी कार्यरत असल्याची माहिती मिळाल्यावर हडपसर पोलिसांनी तेथे छापा घालून त्यांना पकडले. अश्या प्रकारचे अजून एजंट असल्याची पोलिसांना दाट शक्यता आहे. या आरोपींची २५ प्रकारचे शिक्के सापडले आहेत.
अप्पर पोलीस आयुक्त सुनील फुलारी, पोलीस उपायुक्त सुहास बावचे, सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील देशमुख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रघुनाथ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे, स.पोनि. संजय चव्हाण, पो.हवा. रमेश साबळे, पो.हवा. राजेश नवले, पो.हवा. औचारे, पो.हवा. युसूफ पाठव, पो.ना. शद्ब भोजराव,पो.ना. विनोद शिवले, पो.शी. अकबर शेख , पो.ना. प्रताप गायकवाड, पो.ना. अनिल कुसाळकर, पो.शी. शाहिद शेख ,पो.शी. अमित कांबळे,पो.ना. गणेश दळवी, पो.शी. ज्ञानेश्वर चित्ते, पोशी गोविंद चितळे  यांनी केली आहे.

Leave a comment

0.0/5