Skip to content Skip to footer

संरक्षक भिंत कोसळून कोंढव्यात १५ जणांचा मृत्यू

 

कोंढव्यातील सोमजी पेट्रोल पंपाजवळील आल्कर स्टायलस या इमारतीची संरक्षक भिंत मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास लेबर कॅम्पवर कोसळून  झालेल्या दुर्घटनेत १५ जणांचा मृत्यु झाला़ अग्निशामक दलाला ठिगाऱ्यांखालून  ३ जणांना जिवंत काढण्यात यश आले आहे. मृतांमध्ये ११ पुरुष, ३ महिला आणि ४ मुलांचा समावेश आहे.

या दुर्घटनेतील मृतांची नावे आलोक शर्मा वय २८,  मोहन शर्मा वय २०, अजय शर्मा वय १९, अभंग शर्मा  वय १९, रवी शर्मा १९, लक्ष्मीकांत सहानी वय ३३, अवधेत सिंह वय ३२, सुनिल सिंग वय ३५, ओवीदास वय ६, सोनाली दास वय २ , विमा दास वय २८, संगीता देवी वय २६ अशी मृत्यु पावलेल्यांची नावे आहेत. हे सर्व जण बिहार आणि ओडिशामधील राहणारे आहेत. या परिसरात सुरु असलेल्या बांधकामाच्या साईटवर ते काम करतात.

आल्कर स्टायलस ही इमारत उंचावर असून तिची संरक्षक भिंत दगडाने बांधलेली होती. ४ फुट उंच असलेली ही इमारत पाऊस आणि शेजारी सुरु असलेल्या खोदकामामुळे कोसळली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या भिंतीच्या खालच्या बाजूला मजूरांसाठी तात्पुरत्या पत्र्याच्या झोपड्या बांधण्यात आल्या होत्या. या संरक्षक भिंतीच्या खालच्या बाजूला पोकलेनचा वापर करुन शोधकाम करण्यात येत होते़

वरुन पडणारा पाऊस आणि खोदकाम यामुळे मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास ही संरक्षक भिंत झोपड्यांवर कोसळली़ भिंतीच्या ढिगाºयाखाली सर्व जण गाडले गेले़ अग्निशामक दलाला याची माहिती मिळताच त्यांच्या दोन गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या़ एनडीआरएफचे दलही त्यांच्या मदतीला धावून गेले. त्यांनी तातडीने ढिगारा बाजुला करुन आत अडकून पडलेल्या लोकांना बाहेर काढण्यास सुरुवात केले. पोकलेनच्या सहाय्याने सकाळी आठ वाजेपर्यंत ठिगारा बाजूला करण्यात आला होता़ एका बाजूचा काही ढिगारा काढण्याचे काम बाकी आहे.

अग्निशामक दलाला या घटनेची माहिती मध्यरात्री १ वाजून ५० मिनिटांनी मिळाली़ अग्निशामक दलाचे अधिकारी, कर्मचारी तातडीने तेथे पोहचले़ त्यांना एक जण जिवंत आढळून आला़ त्याने अग्निशामक दलाला पाहून आवाज दिला. त्याला प्रथम अग्निशामक दलाने वाचवून बाहेर काढले़ त्याने मग जवानांना कोण कोण कोठे असून शकेल, याची माहिती दिली. त्यानुसार अग्निशामक दलाने एक वाचलेला होता़ त्याने आवाज दिला़ त्याला प्रथम अग्निशामक दलाने तेथील ढिगारा बाजूला काढण्याचे काम सुरु केले़ त्यात एका महिलेच्या डोक्यावर पत्रा पडल्याने ती वाचली होती तिचे पाय मात्र ढिगाऱ्याखाली अडकले होते. अग्निशामक दलाने तिला बाहेर काढले. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी घटनास्थळी भेट दिली असून या दुर्घटनेस जबाबदार असलेल्या बिल्डर आणि कंत्राटदारांवर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.

Leave a comment

0.0/5