Skip to content Skip to footer

हिंजवडीतील पुलाला तडे

हिंजवडीकडून वाकडकडे येण्यासाठी मुठा नदीवर नव्याने बांधण्यात आलेल्या पुलाला तडे गेले आहेत. परिणामी हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. हिंजवडी येथे मुंबई-पुणे ‘एक्स्प्रेस वे’ला जोडण्यासाठी तसेच वाकड आणि हिंजवडीकडे जाण्यासाठी मुठा नदीवर हा पूल बांधण्यात आला होता. मात्र, पाच महिन्यांतच या पुलाला तडे गेल्याने पुलाच्या कामाबाबत नागरिक प्रश्न उपस्थित करू लागले आहेत.

आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंजवडीत नोकरीसाठी हजारो नागरिक ये-जा करतात. त्यामुळे या भागात सातत्याने वाहतूक कोंडी होते. या कोंडीतून नागरिकांची सुटका व्हावी यासाठी हा पूल बांधण्यात आला. पाच महिन्यांपूर्वी या पुलाचे उद्‌घाटन करण्यात आले होते. त्यानंतर पहिल्याच पावसात या पुलाला तडे गेल्याने हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्याने हिंजवडीतील वाहतूक प्रश्न जटील होण्याची शक्यता आहे.

Leave a comment

0.0/5